UAE च्या पुर्वी ‘या’ 5 मुस्लिम देशांसह 8 राष्ट्रांनी दिला PM मोदींना ‘सर्वोच्च सन्मान’, ‘पाक’ला ‘जिव्हारी’ लागल्यानं ‘जळफळाट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. यानंतर पाक पंतप्रधान इमरान खान संपूर्ण देशांकडे हा मुद्दा मांडत आहेत. परंतू पाकची बाजू कोणताही देश उचलून धरत नाही. तर दुसरीकडे इतर देश स्वत: भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. मागील काही दिवसांत पंतप्रधान मोदींना अनेक देशांनी सर्वोच्च सन्मानाने गौरवले, तर आता मुस्लिम बहुल देश असलेल्या यूएईने देशील सर्वोच्च नागरिक सन्मानाने म्हणजेच ऑर्डर ऑफ जायेदने सन्मानित केले. यानंतर मात्र पाकिस्तानला ही बाब पटली नाही.
pm-modi

पाक या गोष्टीने धक्यात आहे की, इस्लामिक देश असून इस्लामिक देशाचे काहीही ऐकत नाहीत तर दुसऱ्या धर्माच्या देशाला भारताला आणि भारताच्या पंतप्रधानांना सन्मान देतात. खरंतर हा भारताच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय धोरणांचा आणि नीतिचा परिणाम आहे. इस्लामिक देश पाकिस्तानचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत.

पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच एखाद्या दुसऱ्या देशाने सर्वोच्च नागरिक म्हणून सम्मान दिला आहे असे नाही तर या आधी पंतप्रधान मोदींना अनेक देशांनी सर्वोच्च सन्मान दिला आहे. मालदिवने 8 जून 2019 ला पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ निशानिजुद्दीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रशियाने 12 एप्रिल 2019 ला ऑर्डर ऑफ सेंट एंड्युज पुरस्काराने सन्मानित केले.
दक्षिण कोरियाने 24 ऑक्टोबर 2018 रोजी सियोल शांति पुरस्कार देऊन गौरवले.
संयुक्त राष्ट्र संघाने मोदींना 3 ऑक्टोबर 2018 साली चॅपियन ऑफ द अर्थ पुरस्कार दिला.
फिलिस्तानने 10 फेब्रुवारी 2018 ला ग्रॅंड कॉलर ऑफ फिलीस्तान असा पुरस्कार दिला.
सौदी अरबने 3 एप्रिल 2016 साली ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद हा पुरस्कार दिला.
अफगाणिस्तानने 3 एप्रिल 2016 ला ऑर्डर ऑफ गाजी अमिर अमानुल्ला खान सन्मान देऊन सन्मानित केले.

पंतप्रधान मोदी अशा वेळी यूएईमध्ये आहेत, जेव्हा पाकिस्तान मुस्लिम देशांना भारताच्या विरोधात समर्थन मागत आहेत. परंतू याच दरम्यान यूएईने पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च सन्मान दिल्याने पाकिस्तानच्या जिव्हारी लागले आहे.

मोदींनी आंतराराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट केले की जगभरातील दहशतवादात चांगले दहशतवाद वाईट दहशतवाद असे काहीही नाही, दहशतवादाला धर्म नसतो. त्याची कोणतीही सीमा नसते. संपूर्ण जगाने मिळून दहशतवादाचा खात्मा केला पाहिजे.  आज मात्र दहशतवाद पोसणारा पाकिस्तान जगभरात एकटा पडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like