मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी एकास अटक

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. आरोपीला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद रफीक असे अटक केलेल्या आरोपीचे आहे. रफीकला अगोदर देखील 1998 मध्ये कोयंबतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली होती.

रफीकवर तामिळनाडूमधील व्यवसायिक प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर मोदींच्या कटाची चर्चा केल्याचा आरोप आहे. अशा आशयाची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिली आहे. रफीक यांची फोनवर झालेल्या संवादाची ऑडीओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . या ऑडीओ क्लिपमध्ये तो पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रफीक याला 1998च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झाली होती. त्यानंत शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर तो बाहेर आला होता. आता नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कट रचल्या प्रकरणी त्याला पुन्हा अटक केली आहे.

जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यातील ती चर्चा प्रामुख्याने ”गाडी घेण्यासाठी आर्थिक व्यवहारा संदर्भातील होती. पण अचानक विषय बदलला आणि रफिक म्हणाला आम्ही पंतप्रधान मोदींच्या हत्येची योजना तयार केली आहे. यापूर्वी 1998मध्ये लालकृष्ण अडवाणी कोयंबतूर शहरात आले होते तेव्हा आम्ही बॉम्ब स्फोट घडवले होते,”असा संवाद फोनवर झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.