ICC World Cup 2019 : भारताच्या पराभवामुळं कोणाचं लक्षच नाही शमीच्या ‘या’ वर्ल्ड रेकॉर्डकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा भारताचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. फक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने ६ पेक्षा कमीच्या सरासरीने गोलंदाजी केली.

मात्र मोहम्मद शमीने १० षटकांत ६९ धावा देताना ५ बळी मिळवत उत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने एक शानदार विक्रम देखील प्रस्थापित केला, मात्र भारताच्या पराभवामुळे तो पुढे आला नाही. वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेत सर्वात जलद ३० बळी मिळवण्याचा पराक्रम त्याने केला आहे. हा विक्रम त्याने १० सामन्यांतच केला आहे.

सर्वात जलद ३० बळी घेणारे खेळाडू

१)मोहम्मद शमी – १० सामन्यात ३० विकेट, एकूण ३० विकेट
२) मिशेल स्टार्क – १० सामन्यात २८ विकेट, एकूण ४६ विकेट
३) लसिथ मलिंगा – १० सामन्यात २४ विकेट, एकूण ५५ विकेट
४) इमरान ताहिर – १० सामन्यात २४ विकेट, एकूण ३९ विकेट
५) ट्रेंट बोल्ट – १० सामन्यात २३ विकेट,एकूण ३५ विकेट
६) शॉन टैट – १० सामन्यात २३ विकेट, एकूण ३४ विकेट
७) टिम साउदी – १० सामन्यात २२ विकेट, एकूण ३३ विकेट
८) ब्रेट ली – १० सामन्यात २२ विकेट, एकूण ३५ विकेट

दरम्यान, वर्ल्डकपमध्ये सर्वच गोलंदाजांच्या कामगिरीचा विचार करायचा म्हटल्यास पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने सलग तीन सामन्यांत ४ पेक्षा जास्त जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. २०११ मधील वर्ल्डकप स्पर्धेत त्याने हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी याने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक देखील घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे