मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनं शेअर केला व्हिडीओ, पुन्हा झाली ट्रोल ! (व्हिडीओ)

भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून हसीन आपल्या काही व्हिडीओमुळं चर्चेत येत आहे आणि ट्रोल होत आहे. असं असलं तरीही तिनं ट्रोलर्सला फाट्यावर मारून खूप बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता आणि ट्रोलर्ससाठी तिनं खास मेसेजही दिला होता. यानंततर हसीन पुन्हा एकदा हुक्का मारतानाच्या व्हिडीओमुळं चर्चेत आली होती आणि तेव्हाही ट्रोल झाली होती. या सगळ्यानंतर आता तिनं वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसाठीसुद्धा हसीन प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

हसीननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला लडकी ब्युटीफुल कर गई चुल हे गाणंही सुरू आहे की. हसीन जीममध्ये आहे. तिनं मास्कही लावलेलं नाही. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये हसीन म्हणते, “लडकी ब्युटीफुल कर गई चुल.” यात ती वेगवेगळे वर्कआऊट करत आहे आणि व्हिडीओत एक्सप्रेशन देत आहे.

हसीनचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहींना तो आवडला आहे. परंतु अनेकांना तिचा हा व्हिडीओ खटकल्यानं ती नेहमी प्रमाणं ट्रोल होत आहेत. अनेकांनी व्हिडीओवर केंट करत तिला ट्रोल केलं आहे. याआधीची तिनं जे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते त्यासाठी ती ट्रोल झाली आहे.