Love Jihad च्या कायद्यावर संतापला अभिनेता, म्हणाला – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधात लवकरच मध्य प्रदेश सरकार (Government of Madhya Pradesh) कायदा आणणार आहे. आम्ही विधानसभेत लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत, असं राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) म्हणाले आहेत. हा एक अदखलपात्र गुन्हा असेल आणि यात दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल. आता अभिनेता जिशान अय्युब (Zeeshan Ayyub) हा मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयावर संतापला आहे. आता धर्म पाहून प्रेम करायचं का, असा सवाल त्यानं सरकारला विचारला आहे.

प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की, प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल ?
जिशानने ट्विट केलं आहे की, प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की, प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल ? घाबरू नका. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना आता कोणी टोकणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं जाईल. लव्ह जिहादसारख्या खोट्या संकल्पनेवर कायदा तयार केला जात आहे. वाह, सरकार कमाल केली तुम्ही असं म्हणत त्यानं सताप व्यक्त केला आहे. जिशाननं केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या राज्यांतही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.