विहंपच्या धर्मसभेत मोहन भागवतांनी राम मंदिराच्या विषयावर बोलणं टाळलं

प्रयागराज : वृत्तसंस्था – प्रयागराज येथील धर्मसंसदेत राममंदिराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. अयोध्येत २१ फेब्रुवरीला अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी पहिली वीट रचण्याचा प्रस्ताव या सभेत मान्य झाला. त्यामुळे या निर्णयावर सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका पाहणे महत्त्वाचे होते. मात्र विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिरावर बोलणं टाळलं. धर्मसंसदेतील साधू-संतांचे लक्ष होतं. मात्र भागवत यांनी राममंदिराच्या विषयावर मौन बाळगलं.

विश्व हिंदू परिषदेची २ दिवसीय धर्मसंसद कालपासून सुरु झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवतयोगगुरू रामदेव बाबाश्री श्री रविशंकर तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. आश्वासनं देऊनही साडे चार वर्षात मोदी सरकारनं राम मंदिराची वीटही रचली नाही, म्हणून या धर्म संसदेत राम मंदिरावर विहिंप काय भूमिका घेईल. हे पाहणं महत्वाचं होतंमात्र मोहन भागवतांनी यावर बोलणं टाळलं.

हिंदू धर्म तोडण्यासाठी कट कारस्थानं शिजत आहेअसा आरोप मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच शबरीमलाच्या मुद्द्यावर भागवत यांनी वक्तव्य केलं. कोणत्याही हिंदू महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाही. तेव्हा काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेतअसा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, धर्मसंसदेत २१ फेब्रुवारीपासून राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. त्यानंतर काम पुर्ण होईपर्यंत सर्व साधू-संत आंदोलन करतील. या आंदोलनामध्ये कुणी आल्यास साधू संत गोळी झेलण्यासाठीही तयार असतीलअसंही धर्मसंसदेत सांगण्यात आलं.