Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Mohan Bhagwat | एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जम्मू काश्मीरला (jammu and kashmir) विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यासंदर्भात मोठ वक्तव्य केलं आहे. ३७० कलाम रद्द केलं मात्र काश्मीर मधील समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं नाही. त्या ठिकाणी असणारा काही लोकसंख्या असणारा भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे. त्यामुळे समाजाला या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की, त्यांना भारतासोबत एकरूप होता येईल असे भागवत यांनी म्हंटले.

मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, जम्मू काश्मिरचा नुकताच दौरा केला आहे. त्या ठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महिन्यात मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना भारताचा भाग बनून राहायचं हे आणि आता ते कोणत्याही समस्ये शिवाय भारतीय बनून राहू शकतात. जम्मू आणि लडाखला यापूर्वी भेदभावाचा सामना करायला लागत होता. काश्मीर खोऱ्यात कारच होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा स्थानिक नेत्यांच्या खिशात जात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला. यामध्ये आता बदल झाला असून येथील लोक आनंदाने जगत आहेत. पुस्तकांऐवजी हातात दगड देणाऱ्या लोकांनी त्यांचं कौतुक बंद केलं आहे. एकूणच निराळं वातावरण तेथे आहे. येत्या काळात तेथे निवडणुका होतील आणि सरकारही स्थापन होईल असंही भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

 

Web Title : Mohan Bhagwat | abrogation article 370 did not solve problem jammu and kashmir rss mohan bhagwat in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले – ‘दिवाळीनंतर एका डोसवर मुक्त संचार’

Pankaja  Munde | ‘मी मोठी नेता नाही पण….’ ! एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या शरद पवारांना पंकजा मुंडेंनी दिलं चोख उत्तर

Aadhaar Services | आता पोस्टमनद्वारे करू शकता आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट; इंडियन पोस्ट पेमेंट बँक देतंय सुविधा, जाणून घ्या