Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ – मोहन भागवत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mohan Bhagwat | डॉ. केदार फाळके (Dr. Kedar Phalke) लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते सोमवारी झाले. श्री शिवाजी मेमोरियल कमिटी श्री शैलम यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यकर्त्यांनी लोकांचा धर्म पहायचा नसताे. हिंदु-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते,’ असं प्रतिपादन भागवत यांनी केले.

 

मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, “हिंदुस्थानवर झालेले अरबी आक्रमण राक्षसी व रानटी होते. इस्लामच्या आक्रमणाचे स्वरूप वेगळे होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. मंदिरे तोडून मानसिक खच्चीकरण करण्याचा हेतू छत्रपतींनी हेरला. त्याविराेधात संघटित शक्ती उभी करून स्वराज्य उभे केलेय. यामुळेच महाराष्ट्र टिकला. छत्रपतींच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीत हाेते तोपर्यंत हिंदूंचं साम्राज्य वाढत राहिलं. तर, इस्लामी आक्रमणाविरोधात कसे प्रयत्न करायला हवेत याचा विचार अनेक वर्षे सुरू होता. भारत टिकणार की नाही याचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाले. त्यांचा आदर्श त्रिकालाबाधित आहे. तो लढा स्वदेशी विरुद्ध विदेशी होता.”

पुढे बोलताना भागवत म्हणाले, “हिंदुस्थानवरील आक्रमण फार पूर्वी सुरू झालेय. जेवढे लुटता येईल तेवढे लुटले. नंतर इस्लामी आक्रमण झालं. हे आक्रमण वेगळं हाेतं. हे समजायला वेळ लागला. इस्लाम आक्रमकांनी परंपरा, धर्म माेडायला लावला. त्याचा प्रतिकार करीत यशस्वी झालेला पहिला लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याच्यातून अटकेपार झेंडे फडकवण्याची प्रेरणा पुढे मिळाली.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, “शिवाजी महाराजांनी दिलेली ध्येयनिष्ठता अटकेपार झेंडे फडकवण्यापर्यंत होती.
मराठ्यांचे सैन्य हिंदू म्हणून लढले नाही. आजही तीच लढाई आहे. असुरांशी लढाई आहे आणि याचे केंद्रही भारतच आहे.
भेद न करता सर्वांना एकत्र उभे राहावे लागेल,” असंही ते म्हणाले.

 

Web Title :- Mohan Bhagwat | we should not rule by making such a distinction between hindus and muslims mohan bhagwat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी समजू नये’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा

 

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट; म्हणाले – ‘मी पुन्हा येईन…’