आ.मोहन फड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीसाठी महा युतीकडून आमदार मोहन फड यांनी गुरुवारी आपला अर्ज दाखल केला. पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड हे दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. मागील वेळा ते अपक्ष निवडून आले होते अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. फड हे पुढेही शिवसेनेत गेले खासदार संजय जाधव यांच्यासोबत त्यांचे बिनसले त्यामुळे त्यांनी पुढे भाजप ची वाट धरली भाजपमध्ये स्थिरावले मोहन फड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाथरी विधानसभेची जागा भाजपसाठी सोडून घेण्याची मागणी केली.

पाथरीची जागा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपाई गटाला सुटली परंतु आमदार मोहन फड यांचे पाच वर्षाचे काम पाहता महायुतीकडून त्यांना पाथरी विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली. तीन ऑक्टोंबर गुरुवार रोजी आमदार मोहन फड आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेच्या माजी आमदार मीराताई रेंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, भाजपा पदाधिकारी विजय सिताफळे, व महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारांसह पाच जणांना प्रवेश देण्यात आला होता.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार मोहन फड सभास्थळी रवाना झाले शहरातून जाणाऱ्या माजलगाव महामार्गावरील नखाते कॉलनी समोरील मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरूवात झाल्यानंतर काही मिनिटातच स्टेज कोसळल्याने सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नसल्याचे कळते. स्टेज कोसळल्याने काही क्षण गोंधळ उडाला स्टेजवरील कार्यकर्त्यांनी उपस्थितांना शांत होण्याचे आवाहन केले. आमदार मोहन फड यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. क्षणातच गोंधळलेले वातावरण स्थिरावले. सभेला मार्गदर्शन करताना आमदार फड यांनी आपल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा मांडला उपस्थितांना पुढे ते म्हणाले हे सर्व आपल्या आशीर्वादाने घडले आहे.

उपस्थितांना परत एकदा संधी द्यावी असे आवाहन आमदार मोहन फड यांनी केले यावेळी उपस्थितांना महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले. शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावरुन नखाते कालीन समोरील मैदान ते सेलु कॉर्नर पर्यंत रॅली काढण्यात आली होती. आमदार मोहन फड यांचा अर्ज भरण्यासाठी पाथरी सोनपेठ मानवत परभणी ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Visit : Policenama.com