
Mohan Joshi On Akashvani Pune | काँग्रेसच्या मागणीला यश ! चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा – मोहन जोशी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mohan Joshi On Akashvani Pune | पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोश व काँग्रेसने केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे. (Mohan Joshi On Akashvani Pune)
मोहन जोशी पुढे म्हणाले की, यासाठी केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता मात्र हे कारण पुन्हा मिळू नये त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्तसेवा केंद्र बंद होण्याचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही तसेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने मार्गी लागण्यासाठी हाती घेतल्यावर पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठींब्या बद्दल पुणेकरांचेही आभार मानतो असे मोहन जोशी शेवटी म्हणाले. (Mohan Joshi On Akashvani Pune)
Web Title : Mohan Joshi On Akashvani Pune | Congress demand success! Don’t postpone the wrong decision, appoint permanent officers – Mohan Joshi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Shasan Aplya Dari | CM यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत लाभाचे वाटप;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण - Akashvani Pune | ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच प्रसारित होणार, प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती
- BJP-Shivsena News | कल्याणच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, श्रीकांत शिंदेही हजर
- Sharad Pawar Gulabrao Patil | ज्यांना कंटाळून उद्धव ठाकरेंना सोडलं, त्यांच्यासोबत रेल्वेने एकत्र प्रवास; शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात काय झाली चर्चा?
- Actor Emraan Hashmi | अभिनेता इमरान हाश्मीची साऊथ इंडस्ट्रीमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ बहुचर्चित चित्रपटात करणार काम