Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

पुणे : Mohan Joshi On Chandrakant Patil | थोर पुरूषांची बदनामी प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारले. २५ हजार रूपयांचा दंड केला. सरकारवर ही वेळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अरेरावीमुळे आली. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करावे अशी मागणी मोहन जोशी Former MLA Mohan Joshi (प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस) यांनी केली. (Mohan Joshi On Chandrakant Patil)

पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर कारवाई केली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की पालकमंत्री पाटील यांनी या प्रकरणात सरकारी पदाचा गैरवापर केला. पोलिसांवर दबाव टाकला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पाटील यांनी अवमानकारक वक्तव्ये केली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांनी त्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला असा आरोप करून कुदळे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याआधी पाटील यांनी, याप्रकरणात कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन वगैरे भाषा वापरली. (Mohan Joshi On Chandrakant Patil)

पोलिसांच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने अटकेची कारवाई बेकायदा ठरवली आहे. तसेच सरकारला २५ हजार रूपयांचा दंडही केला आहे. पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे यात स्पष्ट दिसते. कसब्याच्या निवडणुकीतही त्यांनी याच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे असे जोशी म्हणाले.

Web Title :- Mohan Joshi On Chandrakant Patil | Chandrakat Patil should be removed from the cabinet! Mohan Joshi’s demand; A case where the court fined the Govt

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना