मोहननगर चिंचवडला वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

चिंचवड स्टेशन येथील मोहननगर, लोखंडे रुग्णालयाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे तीन जणांनी हातात कोयते घेऊन सात वाहनांची तोडफोड केली. प्रल्हाद गंगाराम शिंदे (64, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर तीन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B00WTHJ5SU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fcceb9f-8675-11e8-aae6-c1e977770bf3′]

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजताच्या सुमारास हातात कोयते घेऊन तीन जण आरडाओरडा करीत आले. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांची तोडफोड केली. आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे.