गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांची निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे (वय ९०) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.गेल्या काही महिन्यांपासून अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास होत असल्याने तसेच हिमोग्लोबीन कमी झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. उपचारादारम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते, ही रानडे यांची महत्त्वाची ओळख आहे. रानडे यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून गोव्यात प्रवेश केला. पोतुर्गीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. बेती येथील पोलिस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आणि १९५५ मध्ये पोतुर्गीज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी पोतुर्गालमध्ये लिस्बन येथे झाली.

रानडे यांना पोतुर्गालात २६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९६१ मध्ये केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईनंतर ४५० वर्षांच्या पोतुर्गीजांच्या गुलामगिरीतून गोवा स्वतंत्र झाला. रानडे यांच्या सुटकेसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठविला होता. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती.

तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. आण्णादुराई यांनी पोप पॉल यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. पोपनी हस्तक्षेप केल्यानंतर रानडे यांची सुटका झाली. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांनी १४ वर्षे तुरुंगवास भोगला आणि १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली.

त्यानंतर रानडे हे पुण्यात स्थायिक झाले़ रानडे यांचे गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तसेच ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा सरकारने ‘गोवा पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

आरोग्य विषयक वृत्त

तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान

‘ही’ ८ लक्षणे आहेत ल्यूकेमियाची, दुर्लक्ष करणे ठरु शकते जीवघेणे

मायग्रेनच्या वेदनांपासून सुटका हवी असेत तर करा ‘हे’ उपाय