Mohit Kamboj | ‘संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युतीत विष कालवलं’

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Mohit Kamboj | शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) वाकयुद्ध चालू असतानाच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री पदामुळे युतीमध्ये झालेल्या मतभेदाला संजय राऊत जबाबदार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

 

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी खोटी कहानी संजय राऊत यांनी रचली होती. कारण संजय राऊत यांना स्वत: ला मुख्यमंत्री बनायचं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2019) युती तोडण्याचं काम राऊतांनी केलं. हा दुरावा आणखी वाढण्यासाठी राऊत रोज सकाळी येऊन बोलते होते आणि हेच राजकारण असल्याचं मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

 

 

वाधवानला कोरोना काळात (Corona Period) कोणी पास दिला त्यासाठी कोणत्या बंगल्यावरून फोन गेला होता. मागील एक वर्षापासून वाधवान कोणत्या बंगल्यावर आहे, त्याला कोणकोणते नेते भेटायला गेले होते, असा सवाल कंबोज यांनी राऊतांना (Sanjay Raut) केला आहे. त्यासोबतच तुरूंगातील कैद्यांना पंचतारांकित सुविधा कोण पुरवतं?, दवाखान्याला (Hospital) अय्याशीचा अड्डा कोणी बनवला, असंही कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र आता यामध्ये इतरही नेत्यांनी उडी घेतली आहे.

 

Web Title :- Mohit Kamboj | BJP leader Mohit Kamboj on Shivsena MP Sanjay Raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

 

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्प ! बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या पीपीपी तत्वावरील ६५० कोटी रुपयांच्या कामासाठी 2 कंपन्यांच्या निविदा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली’