Mohit Kamboj | राजीव गांधींचा दाऊदच्या ‘त्या’ खास माणसासोबतचा फोटो भाजपच्या नेत्याने केला ट्विट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mohit Kamboj | महाराष्ट्राचं राजकारण अंडरवर्ल्डमधील लोकांभोवती फिरताना दिसत आहे. अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अंडरवर्ल्डशी (Underworld) संंबंधित असलेल्या युसूफ लकडावालाकडून (Yusuf Lakdawala) पैसे घेतल्याचे पुरावे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सादर केला आहेत. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र अशातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे.

 

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्विटमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि युसूफ लकडावाला दिसत आहेत. दोघांचा जुना फोटो त्यांनी शेअर केला असून ट्विटला सभी गुर्गे एक साथ, असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच त्यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे.

 

 

दुसरीकडे संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत राणा यांच्यावर निशाणा साधला होता.
ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग (Money laundering Case) प्रकरणामध्ये यूसुफ लकडावाला याला अटक केलं होतं.
जेलमध्ये असताना त्याचा तुरूंगात मृत्यु झाला होता. त्याने कमावलेल्या बेकायदेशीर पद्धतीने कमाईचा काही भाग नवनीत राणा यांच्या खात्यामध्ये असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

 

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून जे काही घडतंय ते पाहून मुंबईतील घडणाऱ्या घडामोडींमागे डी गँग आणि अंडरवर्ल्डचा पैसा काम करत आहे,
असा गंभीर दावा केला आहे. मात्र आता कंबोज यांनी ट्विट करत लकडावालाच्या केसमध्ये ट्विस्ट आणला आहे.

 

Web Title :- Mohit Kamboj | bjp leader mohit kamboj shared pic of yusuf lakdawala with late pm rajiv gandhi and balram jakhar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील हिट अँड रन घटना CCTV मध्ये कैद, व्यावसायिकावर FIR

 

BJP MLa Ashish Shelar | ‘2017 मध्येच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचं एकत्र सरकार स्थापन करण्याचं ठरवलं होतं पण…’; आशिष शेलारांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

 

Uniform Civil Code | समान नागरी कायदा मुस्लिम स्वीकारणार नाहीत; ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, सांगितलं कारण