
Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अॅग्रो कंपनीचा…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mohit Kamboj-Rohit Pawar | मी सध्या बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचा (Baramati Agro Ltd;) अभ्यास करत आहे. यात मी त्यांच्या कंपनीच्या यशाचाही अभ्यास करत आहे. लवकरच मी या संदर्भात माहिती देईन. त्यामुळे तुम्हाला या कंपनीच्या यशामागील गोष्ट समजून घ्यायला मदत होईल, असा गर्भित इशारा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना दिला आहे. कंबोज यांच्या यासंदर्भातील ट्विटवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. (Mohit Kamboj-Rohit Pawar)
कंबोज सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा इशारा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच कंबोज यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. शिवाय, लवकरच राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे विधान केले होते. यानंतर रोहित पवार यांनी कंबोज यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला होता. म्हणूनच कंबोज यांनी आता थेट रोहित पवार यांनाच टार्गेट केले आहे. (Mohit Kamboj-Rohit Pawar)
Baramati Agro Ltd Is A Case Study For Start Ups !
I Have Personally Started Studying Achievements Of This Company !
Will Share Brief Study Soon Which Will Help Youth To Understand Success Story Behind This ! @RRPSpeaks
— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) August 22, 2022
मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबोज यांच्यावर टीका केली होती. रोहित पवारांनी सुद्धा कंबोज यांच्यावर टिका करताना म्हटले होते की, मोहित कंबोज यांच्यावर सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावल्याचा आरोप आहे. कंबोजांच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचे हे आपण समजून घेतले पाहिजे, असे म्हटले होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
मात्र, त्यानंतर त्यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला पण सिंचन घोटाळ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
उलट त्यानंतर अजित पवार यांना क्लिनचीट मिळाली होती.
शिवाय, त्यानंतरच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत
पहाटेचा शपथविधी कार्यक्रम करत सत्ता स्थापनेचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
आता मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा पुन्हा उकरून काढला आहे.
Web Title :- Mohit Kamboj-Rohit Pawar | BJP leader mohit kamboj allegations on rohit pawar baramati agro limited in tweet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्यास भाग पडले