Mohit Kamboj | ‘उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानी गजाआड आता…’, भाजप नेते मोहित कंबोज यांचे खळबळजनक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच (Amruta Fadnavis Bribery Case) आणि ब्लॅकमेल (Blackmail) प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला गुजरातमध्ये अटक (Arrest) करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) ही कारवाई केली आहे. यानंतर भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या फ्रंटमॅनला अटक झाली आहे. आता संजय पांडे (Former Police Commissioner Sanjay Pandey) आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरु, असं ट्विट मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलं आहे.
काय म्हणाले मोहित कंबोज?
उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन बुकी अनिल जयसिंघांनीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एक पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. तुम्ही लवकरच उघडे पडणार आहात. जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात ते स्वत:च एक दिवस त्या खड्ड्यात पडतात. असे ट्विट मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केले आहे. कंबोज यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Uddhav Thackrey Front Man Bookie Anil JaiSinghani Arrested By Mumbai Police !
Ex CP Sanjay Panday and One Ex CP Count Your Days ,U All Will Be Exposed Soon !
जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं …..— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) March 20, 2023
कोण आहे अनिल जयसिंघानी?
– उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
– 2010 मध्ये बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक
– ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या जवळचा व्यक्ती
– जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police CP) झाल्यानंतर कमिश्नर ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
– 1995 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Ulhasnagar Municipal Election) लढवली
– 1997 मध्ये पुन्हा निवडणुक लढवली मात्र पराभव झाला
– 2002 साली राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
– 15 गुन्हे दाखल असून मागील 9 वर्षांपासून फरार
काय आहे प्रकरण?
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला ताब्यात घेतले आहे. अनिक्षाने वडिलांना सोडण्यासाठी एक कोटी रुपये लाच देण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसी 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : Mohit Kamboj | uddhav thackrey front man bookie anil jaisinghani arrested by mumbai police ex cp sanjay panday and one ex cp count your days said mohit kamboj
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या