राष्ट्रवादीला धक्का : मोहिते पाटील पिता-पुत्राचा उद्या भाजप प्रवेश !

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे उद्या भाजपमध्ये जाणारा असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

एक अंदाज असा हि लावला जातो आहे कि,  विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच राहणार आहेत. फक्त रणजितसिंह मोहिते पाटीलच भाजपमध्ये जाणार आहेत.  त्यामुळे पितापुत्र दोघेही भाजपमध्ये जाणार, कि फक्त रणजितसिंह मोहिते पाटीलच भाजपमध्ये जाणार या प्रश्नाचे उत्तर उद्या दुपारी मिळण्याची शक्यता आहे. तर उद्या बुधवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार  आहेत .

आपली भूमिका कार्यकर्त्यांना समजून सांगण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या अकलूज येथील शिवरत्न या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.  हा मेळावा आज मंगळवारी ३ वाजता पार पडणार आहे.  त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीची भूमिका या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. म्हणून या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.