ICC World Cup 2019 : वर्ल्डकपनंतर निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हकची हकालपट्टी ‘नक्की’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. पाकिस्तान सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचे पाच गुण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पुढील तीनही सामन्यांत त्यांनी विजय मिळवल्यास त्यांना सेमीफायनलचे दरवाजे उघडे राहतील. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे ११ गुण होतील.

पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होतील. त्यामुळे अशा परिस्थिती पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत पीसीबीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्ल्डकप स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे कि, निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांना देखील पदावरून काढून टाकले जाणार आहे. मात्र या सगळ्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोहसीन खान यांना निवड समितीचे प्रमुख म्हणून नेमणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची निवड समिती प्रमुख किंवा पाकिस्तान संघाच्या मॅनेजरपदी नेमले जाईल.

मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर तसेच गोलंदाजी प्रशिक्षक अझहर मेहमूद यांची हकालपट्टी नक्की आहे. त्यामुळे आता जवळपास सर्वच प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, मोहसीन खान याआधी २०१० आणि २०११ धे पाकिस्तानच्या निवड समितीचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या

तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’

नेहमीच जेवणावर ताव मारत असाल तर होऊ शकतो ‘हा’ त्रास