मोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोहसिन शेख खून प्रकरणात आरोपी असणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याचा आज मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थी जामीन मंजूर केला आहे. अभियंता मोहसिन शेख खून खटल्यात हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई अटकेत आहेत. गेल्या काही वर्षापासून याबाबत कोर्टात खटला सुरु आहे.

हडपसर येथे उसळलेल्या दंगलीत अभियंता मोहसिन शेख याचा खून झाल्यानंतर पोलिस तपासानंतर मोहसिन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (वय ३४, रा. हिंदूगड, मुळशी ) आणि इतर २० आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे  ११ जून २०१४ पासून अटकेत आहेत.

यापूर्वी 2017मध्ये फेटाळला होता जामीन
घकिय औषध उपारासाठी जामिन मिळावा या साठी  देसाईने जिल्हा न्यायाधिश यांच्या कडे जामिन अर्ज केला होता. त्याची आज दि 3 ऑगस्ट 2017 रोजी सुनावणी झाली सुनावणीत देसाईची जामिन अर्ज रद्द व्हावा अशी जोरदार मागणी सरकारी वकिल यांनी केली .तसेच जामिन मिळाल्यास देसाई हा पुराव्यानिशि छेडछाड करू शकतो असा युक्ती वाद सरकारी वकिल यांनी केला याची दखल घेत जिल्हा न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळून लावला.

काय आहे नेमकं प्रकरण ?
फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी केली, तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून 2 जून २०१४ रोजी हडपसरमध्ये दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा खून करण्यात आला. या प्रकरणी शेखच्या भावाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी धनंजय देसाई याच्यासह इतर २० आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणी अ‍ॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.