राहुरीतील ‘त्या’ हल्लेखोरांवर मोक्कानुसार कारवाई करा

पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांचा आढावा घेण्याचे एसपी सिंधू यांचे आश्‍वासन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणार्‍यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर ‘मोक्का’नुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येवले यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन करतानाच जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली जाईल. त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, असेही पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी स्पष्ट केले.

राहुरीचे पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर राहुरीमध्ये झालेल्या प्राणघातक हल्याचा निषेध आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक ईशू सिंधू यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, सकाळचे कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे पाटील, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्सचे विजयसिंह होलम, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता, नंदकुमार सातपुते, मुरलीधर कराळे, अरुण वाघमोडे, मोहनीराज लहाडे, मिलिंद देखणे, गणेश शेंडगे, साहेबराव कोकणे, बाबा ढाकणे, अण्णासाहेब नवथर, सूर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, मयुर नवगिरे, राजू खरपुडे, विक्रम बनकर, दत्तात्रय उनवणे, सतिश रासकर, वाजिद शेख, साजिद शेख, अनिल चौधरी, जितेंद्र निकम, शिरीष शेलार, संदीप रोडे, सागर आतकर, प्रा. सुभाष सिंधे, सुधीर मेहता, अभिजित निकम, रियाज पठाण, सिद्धार्थ दीक्षित, बबलू शेख, शब्बीर सय्यद, सुशिल थोरात, मुकुंद भट, राजेंद्र येंडे, निखिल चौकार, शरद कासार, शरद मेहकरे, दत्ता इंगळे, शेख रियाज, संदीप कुलकर्णी, विजयसिंह होलम, नरेंद्र अंकुश, संदीप गाडे, कैलास ढोले, विक्रम लोखंडे, समीर दाणी, गोरख देवकर, प्रतिक शिंदे, कुणाल जायकर, विजय मते, नौशाद तांबोळी यांच्यासह विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आदी सहभागी झाले होते.

प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी राहुरीतील पत्रकार धक्कादायक असून तेथे गुंडमवाल्यांचे राज्य असल्याकडे लक्ष वेधले. राहुरीतील या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करा, अशी मागणी केली. लोकमतचे सुधीर लंके यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला आणि गेल्या काही वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा पुढे काय तपास झाला, हे समजत नसल्याने याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. बाळ ज. बोठे पाटील यांनी पत्रकारांवर होणारे असे भ्याड हल्ले निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. महेंद्र कुलकर्णी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सुधीर मेहता यांनीही भूमिका मांडली.

‘अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनदार घ्या’
पत्रकारांवरील वाढते हल्ले हे चिंताजनक असल्याचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या निदर्शनास आणून देतानाच पोलिस प्रशासनाकडून आता पत्रकारांच्या अपेक्षा वाढल्या असल्याकडे प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी लक्ष वेधले. राहुरीतील घटनेत पत्रकारावर हल्ला करणार्‍या आरोपींना मोक्का लावण्याची मागणी करतानाच या आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर जामिनावर सोडण्याआधी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करताना न्यायालयीन अधिकार प्राप्त असणार्‍या गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी या सर्व आरोपींना कलम ११० नुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकार देण्याची अट टाकावी, अशी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे. प्रत्येक आरोपीसाठी नगर जिल्ह्यातील दैनिकाचा स्वतंत्र अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनासाठी या आरोपींनी दिला, तरच त्यांचा जामिन करावा अशी मागणीही केली.

Loading...
You might also like