साडेपाच लाखांचा घोळ मासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पालघर मधील मुरबे गावातील साई लक्ष्मी बोटीला लागलेल्या घोल माशाच्या बोथ (माशाच्या पोटातील पिशवी)  साडेपाच लाख रुपयांना विकला गेला. तर रत्नागिरी येथे देखिल एका खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मच्छिमाराला देखिल घोळ मासे मिळाले होते.

या हंगामाच्या सुरवातीलाच घोळ मासे मिळत असतात. सध्या मिळणारे घोळ मासे ही तर मच्छिमाराला लागलेली लॉटरीच असून सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

[amazon_link asins=’B078P6FMDS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4dde7e5e-9ac2-11e8-a517-d9dc9cd359f8′]

घोळ हा मासा क्रोकर म्हणजे सायानिडी कुळातील माशांत मोडतो. या माशांच्या अन्नमार्गाला एक हवेची पिशवी म्हणजे एअर ब्लॅडर जोडलेले असते. या पिशवीचा आकार गाजरासारखा असतो. या अतिरिक्त श्वसनाच्या  अवयवामुळे पाण्याबाहेरही हवा घेऊन ती या पिशवीत साठवता येते. या पिशवीच्या मदतीने हे मासे काही आवाज ही काढू शकतात.

फिश मॉं म्हणूनही या पिशव्या ओळखल्या जातात. घोळ माशाच्या नरांना असणाऱ्या या पिशव्या माद्यांच्या पिशवींपेक्षा जास्त दर्जेदार असतात आणि त्यांना म्हणूनच चांगला दर मिळतो. ही पिशवी सुकवून विकल्यास किलोमागे ५० हजार रुपयांपर्यंत मच्छिमाराला मिळू शकतात. घोळसारख्या माशांच्या हवेच्या पिशवीचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे  धागे. जखम शिवण्यासाठी हे धागे वापरले जातात. काही कालावधीनंतर हे धागे विरघळून जाऊ शकतात.

चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरला मोठ्या प्रमाणात हे मासे निर्यात केले जातात. या हवेच्या पिशव्यांचा  दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे  आयसिंग्लास. बियर किंवा वाईन बनवण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आयसिंग्लास वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. यांमधील सूक्ष्म कण काढून बियर किंवा वाईन क्रिस्टल क्लियर करण्यासाठी घोळ माशाच्या सुकवलेल्या हवेच्या पिशव्या वापरल्या जातात. कोलॅजेनने बनलेल्या या पिशव्यांचे धागे, बियर किंवा वाईनमध्ये भिजून अतिशय बारीक आसांची जाळी तयार करतात. त्यात बियर किंवा वाईन बनवण्यासाठी फेरमेंटेशन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या यीस्टचे अतिसूक्ष्म कण अडकून पडतात. हे वेगळे केले की क्रिस्टल क्लियर बियर किंवा वाईन मिळते. हे सूक्ष्म कण काढून टाकण्यासाठी इतर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली तर ती या पेयांच्या चवीत बदल घडवून, त्याला मारक ठरू शकते. त्यामुळे  बहुसंख्य  ब्रेव्हरीज  आयसिंग्लास  वापरणे पसंत  करतात.

चायनीज आहारात समुद्रातून मिळणाºया ४ चविष्ट सी फूड्सपैकी एक म्हणजे घोळ मासा. यात स्निग्ध घटक कमी असतात पण यात ग्लायसिन, प्रोलीन, ग्लुटामिक आम्ल,अलानाईन आणि अर्जिनाईन या अमिनो आम्लांचे प्रमाण जवळ जवळ ६६.२% असते. पारंपरिक शक्तिवर्धक औषध म्हणून या माशाचा उपयोग पुरातन काळापासून आशिया खंडात केला जात आहे़ खाद्य पदार्थ बनवण्यासाठी ही या माशाचा उपयोग चीन मध्ये केला जातो. शरीरातील  रक्त पुरवठा सुधारण्यासाठी या माशांपासून खाद्य पदार्थ येथे बनवले जातात. उष्ण वाळूत  ते छान स्वच्छ पांढरे होईपर्यंत  भाजून किंवा तेलात तळून  आवडीने खाल्ले जातात.

घोळ हा फॅटी फिश म्हणजे स्निग्धता असणारा मासा आहे. यातील ओमेगा ३ स्निग्धाम्ल हे हृदयविकारांवर अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या त्वचेपासून जिलेटीन मिळवता येते. घोळ मासा हा मच्छिमारांसाठी एक सागरी खजिनाच म्हणता येईल असा  मासा आहे. थव्याने राहणारे हे मासे किनाºयाशी खडकाळ भागात पावसाळ्यात अंडी घालायला येतात. जाळ्याने  किंवा किनाऱ्याजवळ गरवून हे मासे पकडले जातात. त्यामुळे सध्या मिळणारे हे मासे खवैय्यांसाठी जशी पर्वणी आहे तशी मच्छि मारांसाठी एक पर्वणीच  ठरत आहे.