शिक्षकाकडून मुख्याध्यापिकेस अश्‍लील शिवीगाळ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुक्यातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ धोंडिबा मेहेर याने अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ३१ मे रोजी सदर मुख्याध्यापिकेची पदावर नियुक्ती केली होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही मुख्याध्यापिकेस तसा आदेश दिला आहे. मुख्याध्यापिकेने पदभार घेतल्यानंतर २८ मे रोजी शाळेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजता हरिभाऊ धोंडिबा मेहेर (रा. भूषणनगर, केडगाव) हा सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात आला. ‘तू या खुर्चीवर कशी बसलीस’, अशी विचारणा करून अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मुख्याध्यापिकेच्या गळयातील अडीच तोळयांचे सोन्याचे मिनीगंठण, कानातील रिंग गहाळ केली.

याप्रकरणी सदर मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून हरिभाऊ मेहेर याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय

पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण 

‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा