पुण्यातील MT चे DIG निशिकांत मोरे यांच्याविरूध्द विनयभंगाचा FIR दाखल

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एमटी (मोटार ट्रान्सपोर्ट) विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांच्यावर नवी मुंबईत विनयभंग आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी निशिकांत मोरे यांनी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे सांगितले होते. तर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले होते. अखेर पोलीस महानिरीक्षक मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण –
डीआयजी मोरे आणि पीडित मुलीच्या वडिल यांच्यात आठ वर्षापूर्वी खारघरमध्ये ओळख झाली. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी ये-जा करत असत. दरम्यान, जून महिन्यात सतरा वर्षाच्या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसताना मोरे घरी आले. त्यांनी केक कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मोरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.

निशिकांत मोरे यांचे म्हणणे – 
पीडित मुलीच्या वडिल आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. पीडित मुलीच्या वडिलांनी दोन फ्लॅट बुक केले होते असून त्यातील एक फ्लॅट पैसे नसल्याकारणाने घेऊ शकत नसून त्याच्या बुकिंगचे पैसे फुकट जातील म्हणून त्याने आम्हाला घेण्यास सांगितला. त्यावर माझ्या पत्नीने वीस लाख रुपये पीडित मुलीच्या वडिलांना दिले. मात्र, बांधकाम बेकायदेशीर असून त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देखील मिळालेले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांकडे पैसे मागितले. पत्नी पैसे मागण्यासाठी गेली असता त्याने पत्नीला वाईट वागणूक दिली. त्यावेळी मी पुण्यात होतो. त्यावर एक माणुसकी ठेवत आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र आता हे प्रकरण उलट्या दिशेने जात असून याआधीच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना इमेलद्वारे सर्व हकीकत कळवली असल्याचे मोरे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/