पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
मोशी, स्पाईनरोडवर रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तरुणाने विनयभंग केला तर कासारवाडी येथे घरात दिराने भाऊजईचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर समीर राजकुमार महापुरे (२५, रा. मोशी, प्राधिकरण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेली दिड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दोन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्या दुचाकीवरून जात असताना पाठलाग करुन विनयभंग केला.
[amazon_link asins=’B07BRJWK15′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41d7de04-96f5-11e8-a80f-2b61a39b466b’]
कासारवाडी येथील प्रकारात दिराविरुद्ध फिर्याद दिलेली आहे. दिराने घरात जाऊन भाऊजईचा विनयभंग केला. तपास पोलीस करत आहेत.