पुण्यात ‘ऑडिशन’च्या नावाखाली तरुणीला घालायला दिली ‘बिकीनी’, पुढं झालं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट आणि टीव्ही सीरियलसाठी ऑडिशनच्या नावाखाली तरुणीला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मंदार संजय कुलकर्णी (वय-२४) रा. वसंत बहार अपार्टमेंट, प्रभार रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांचे ओळखीचे आहेत. आरोपी मंदार याने तरुणीला चित्रपट आणि टीव्ही सिरियलमध्ये काम  करण्यासाठी शिफारस करतो असे सांगितले होते. तू देखील ट्राय कर असे सांगत त्याने पीडित तरुणीला ऑडिशनसाठी आपल्या घरी बोलावून घेतले.
तरुणी १६ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास मंदारच्या घरी गेली.

मंदारने तिला फोटो शूट करायचे असल्याचे सांगून तिला बिकीनी घालण्यास दिली. व तिचे पाठीचे फोटो मोबाईमध्ये काढले. ते तिला दाखवून कपड्यांचे माप घेण्यासाठी अंगावरील कपडे काढण्यास सांगून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मंदार विरुद्ध पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like