पुण्यात हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग, दोन जणांवर गुन्हा दाखल

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन
उपचार न करता रुग्णाकडून पैसे घेतल्यच्या कारणावरुन दोघांनी हॉस्पिटलमधील महिला नर्सचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार विश्रांतवाडी येथील एका मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडला असून विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली.

बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या ‘त्या’ पोलीस उपायुक्ताचा (DCP) अटकपूर्व जामीन फेटाळला

पिटर वहिले (रा. विश्रांतवाडी) आणि त्याचा मित्रावर (२५ ते २७ वर्ष वयोगटातील) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d3c058a-c238-11e8-9c7d-cdf40150f472′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा मित्र राजनाथ प्रसाद याच्यावर उपचार न करता हॉस्पिटलने पैसे घेतल्याचा जाब विचारण्यासाठी आरोपी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी हजर असलेल्या नर्ससोबत त्यांनी पैसे का घेतले अशी विचारणा करुन त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या शीर्टची कॉलर पकडून तसेच अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला. आरोपी आणि त्याच्या मित्राने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून हॉस्पिलची तोडफोड करण्याची धमकी देऊन डॉक्टरांना देखील शिवीगाळ केली. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केली नाही. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.
वाणगाव रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
ड्रेसिंग रूममध्ये चप्पल घालून येऊ नका, असे सांगितल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केली. एक मर्डर माझ्या नावावर आहे, आता तुला बघतो, अशी धमकीही आरोपीने डॉक्टरला दिली आहे. ही घटना डहाणू तालुक्यातील वाणगाव ग्रामीण रुग्णालयात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाताला काच लागून दुखापत झालेली कनिता दुबळा (वय – ३२) ही उपचारासाठी वाणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात गेली होती. मात्र ड्रेसिंग सुरू असतानाच तिचे दोन भाऊ जयेंद्र व आशीष
दुबळा हे चप्पल घालून आतमध्ये गेले. त्यावर वैद्यकीय अधिकारी मिथिलेश सिंग यांनी त्यांना चप्पल बाहेर काढून या. रुग्णांना संसर्ग होऊ शकतो असे समजावून सांगितले. त्यामुळे संतापलेल्या या दोघा आरोपींनी डॉक्टर सिंग यांना धक्काबुक्की करत लोखंडी