पुणे : फेसबुकवर बनावट खाते उघडून कंपनीच्या संचालकांची व त्यांच्या सुनेची बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुकवर बनावट खाते उघडून अनोळखी व्यक्तीने एका कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या फेसबुक खात्यावर खोटी माहिती पाठवून निवावी पत्राद्वारे संचालिका व त्यांच्या सुनेबाबत अश्लील भाषा वापरून बदनामी केल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर विनयभंग तसेच आयटी अक्टनुसार गुन्हा चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कंपनीच्या ५२ वर्षीय संचालिकेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कंपनी आहे. एका अनोळखी व्यक्तीने जय परेरा नावाने फेसबुकवर बनवाट खाते उघडले. त्यानंतर त्या खात्यावरून कंपनीच्याच एका कर्मचार्‍याला फेसबुकवर कंपनीची व संचालकांची खोटी माहिती पाठवली. तसेच एक निनावी पत्र पाठवून फिर्यादी संचालिक व त्यांच्या सुनेबाबत अश्लील मजकूर वापरून त्यांचा विनयभंग केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like