कोंढव्यात अल्पवयीन मुलीचा ‘मौलाना’कडून ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरी अरबी शिकविण्यासाठी येणाऱ्या एका मौलानाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी अताउल्ला अब्दुल कादर सय्यद (वय २७, रा. मदिना मस्जिद शेजारी, कोंढवा) याच्याविरुद्ध पाॅस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ४ जानेवारी रोजी दुपारी मुलीच्या घरी घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मौलाना सय्यद हा या महिलेच्या ६ वर्षाच्या मुलीला अरबी शिकविण्यासाठी घरी येत असे ४ जानेवारी रोजी दुपारी तो शिकवणीसाठी आला असताना त्याने मुलीला प्रथम मिठी मारली व त्यानंतर तिचा विनयभंग केला. ही गोष्ट मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/