घरात घुसून महिलेचा विनयभंग : आरोपीस अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – उपनगरातील तपोवन रोडवरील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून एका युवकाने पाणी पिण्याचा बहाणा करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी फिर्यादीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात यवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सावेडी गावातील तलाठी कार्यालयाजवळ राहणार दिलीप उर्फ सागर बारस्कर याला अटक करून आज न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

घटनेची थोडक्यात माहिती अशी की, तपोवन रोडवरील ढवणवस्ती येथील एका घरात आरोपी दूध घालण्याचे काम करीत होता. सदर पीडित महिला घरात एकटी असल्याचे पाहून सदर आरोपी पाणी मागण्याचे कारण करून महिलेच्या कंपाउंड भितीवरून उडी मारून घरात घुसला. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलून तिच्याशी गैरवर्तन केले .महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून केला. सदर महिलेचा पती घरी आल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. फिर्यादीत बारस्कर ( पूर्ण नाव नाही ) मी एकटी असल्याचे पाहून आरोपी दूध देऊन परत आला त्याने पाणी मागणी करून त्याने भितीवरून उडी मारून किचनमध्ये येऊन त्याने गैरवर्तन केले, असे म्हटले आहे. ही घटना २० रोजी घडली होती आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like