पुण्यात विनयभंग करत पतीच्या मित्राने लंपास केले दीड लाख

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पतीने दीड लाख रुपये घेऊन बोलवल्याची बतावणी करून मित्राच्या पत्नीला एका लॉजवर नेत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने आणलेले दीड़ लाख रुपये घेऊन तो पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी एकाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

गोकुळ गिरी (रा. नांदेड) याच्याविरोधात ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

गोकुळ गिरी हा पिडीतेच्या पतीचा मित्र आहे. १७ जानेवारी २०१९ रोजी त्याने महिलेला फोन केला. तिला तिच्या पतीने दीड लाख रुपये घेऊन दीघीतील मॅग्झीन चौकात येण्यास सांगितल्याची बतावणी केली. त्यानंतर महिला तेथे गेली. तो महिलेला तेथील एका लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर तिच्याशी तेथे अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. महिलेने आणलेले दीड लाख रुपये देखील घेऊन तो तेथून पसार झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

नखे कुरतडण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात ‘हे’ विविध आजार

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

मासिक पाळीची अनियमितता, ‘हे’ आहेत उपाय

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

You might also like