Pune News : महिलेचा विनयभंग करणार्‍या ठेकेदारासह दोघांवर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  एका महिलेला निर्जनस्थळी नेऊन ठेकेदाराने तिचा विनयभंग केला. तर त्याच्या साथीदाने त्याचे चित्रिकरण केल्याची घटना मंगळवारी (दि. 16) तळवडे स्मशानभूमी जवळ घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नवनाथ आटपाडकर, नरेश चौधरी ( दोघे, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, चाकण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडीत महिलेने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. पीडित महिला हाऊस किपींग कामगार पुरविण्याचे काम करते. त्याचे पैसे घेण्यासाठी ती 16 फेब्रुवारी ठेकेदाराकडे गेली होती. आरोपींनी महिलेला दुचाकीवर बसवून चिखलीतील तळवडे गावठाण स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. निर्जन परिसर असल्याने फिर्यादींनी पुढे जाण्यास नकार दिला. गाडी थांबविली नाही तर गाडीवरुन उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर दुचाकी थांबविली. आरोपी आटपाडकर याने चौधरीला संबंधित महिलेशी खासगी बोलायचे असल्याचे सांगून दूर जाण्यास सांगितले. चौधरी दूर गेल्यानंतर आटपाडकर याने महिलेस मिठी मारली. तिने मदतीसाठी चौधरीला बोलावले. स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर चौधरी याने महिलेला फोन करुन मी लांबून तुमचा व्हिडीओ बनवला आहे. तू कोणालाही सांगू नको अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.