लातूर : विनयभंग करुन तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी सरपंचासह 17 जणांवर किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन –   तरुणीचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी सरपंचासह 17 जणांवर किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरा (ता. अहमदपूर) येथे शुक्रवारी (दि. 12) दुपारी ही घटना घडली होती. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिडीत तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरपंच गंगाधर देपे, बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहुल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, शांताबाई आचार्य आदीसह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनवट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरा येथे फिर्यादीच्या घरासमोर ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम करण्यात येत होते. त्यावेळी फिर्य़ादीने माझी आई बाहेर गेली आहे, आल्यानंतर काम करा, असे सांगूनही आरोपींनी तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण केली. दरम्यान ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत सफाई करताना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला, तसेच जेसीबीचे नुकसान केल्याप्रकरणी ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पिडीत मुलगी आणि तिची आई (रा. दोघेही कोपरा) अशा दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय अधिकारी बी. एस. लांजिले हे करत आहेत.