भाजप नेते खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश बारगळला ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षश्रेष्ठीवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी घटस्थापनेच्या मुहर्तावर ते राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते होते. मात्र पक्षांतराबाबतचे त्यांनी शुक्रवारी नो कॉमेंट असे सांगत खंडण केल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत. तुर्तास घटस्थापनेचा मुहूर्त हूकला असला तरी ते विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचे खडसे यांनी खंडण करत तसेच जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील हत्याकांबाबत सरकारवर टीका केल्याने त्यांचा पक्ष प्रवेश सध्यातरी बारगळला आहे. खडसे म्हणाले मी राष्ट्रवादी जाणार मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे माध्यमांनीच ठरवले आहेत.

खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती नाही
खडसे यांच्या प्रवेशाबाबत मला काहीच माहिती नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजकारणात अनेकांचा भेटी होत असतात. त्यानुसार काहीजण मला भेटून गेले. मात्र भेट झाली म्हणजे त्यात काहीतरी असू शकते असे समजणे चुकीचे आहे.