भारतात मी असे पर्यंत ड्रायव्हर लेस कारला परवानगी नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात ड्रायव्हरलेस कारला  परवानगी न देण्याची घोषणा केली आहे.  ड्रायव्हरलेस कारमुळे अनेक लोकांचा  रोजगार हिरावला जाईल असे कारण त्यांनी दिले आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

नवीन तंत्रज्ञानास विरोध नाही –

गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात काही लोकांना ड्रायव्हररहित वाहने  आणायची आहेत. मात्र मी त्यांना हे स्पष्ट केले आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी अशा प्रकारच्या गाड्यांना देशात परवानगी देणार नाही. यावर त्यांनी मला विचारले की तुमचा नवीन तंत्रज्ञानाला विरोध आहे का? मात्र असे काही नाही.

जवळपास एक कोटी लोक  वाहनचालक –

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) लेदर टूल किटच्या वितरण समारंभात गडकरी म्हणाले की, देशात 40  लाख वाहनचालक आहेत. येथे  25 लाख वाहनचालकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत मी एक कोटी लोकांचा रोजगार काढून घेऊ शकत नाही.

Visit : policenama.com