‘पेट्रोल-डिझेल’ची वाहनं बंद करणार नाही, सरकारचं ‘वचन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने वाहन उद्योगासाठी मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांच्या संमेलनात हि घोषणा केली. त्यांनी हि घोषणा करताना म्हटले कि, सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

वायू प्रदूषण कमी करण्यावर भर

या वार्षिक बिथकीत बोलताना गडकरी म्हणाले कि, आज वायू प्रदूषण हि सर्वात मोठी समस्या असून कंपन्यांनी यावर काम करायला हवे. त्याचबरोबर यामुळेच अनेक जण पेट्रोल आणि डिझेलच्या गाडया बंद करण्याची मागणी करत आहेत. मात्र सध्या सरकारचा असा कोणताही विचार नाही. त्याचबरोबर कंपन्यांनी वायू प्रदूषण कशाप्रकारे कमी करता येईल यावर देखील काम करावे ,असा सल्ला त्यांनी कंपन्यांना दिला.

68 नवीन महामार्ग पुढील 3 महिन्यात

यावेळी बोलताना त्यांनी नवीन 68 महामार्गांची पुढील  महिन्यांत घोषणा होणार असल्याचे देखील सांगितले. यासाठी मंत्रालय  5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. यासाठी जमिनीच्या अधिग्रहणाची कारवाई परब झाली असून लवकरच याच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.