खुशखबर ! ‘या’ कंपनीच्या कारवर 4 लाखापर्यंत ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या ऑफर

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – मंदी असूनही सणाच्या दिवसांत  कार विक्री वाढविण्यासाठी कार डीलर्सकडून मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मंदीनंतर गाडी घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं त्याचा मोठा फटका ऑटो इंडस्ट्रीला बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होंडा कंपनी चारचाकी गाड्यांवर एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये वॉरेंटी वाढवणं, इंश्युरन्स, अ‍ॅक्सिसरीजवर 4 लाखांपर्यंत कॅश डिस्काऊंट ग्राहकांना देणार आहे. होंडा कार आपला स्टॉक संपवण्याचा प्रयत्न करीत आहे.

होंडा सिविक –
होंडा सिव्हिक कार खरेदीवर सुमारे अडीच लाख रुपयांची सूट देत आहे. यात रोख सवलत, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. होंडा सिव्हिकची किंमत 17.93 लाख ते 22.34 लाख रुपये आहे.

इंजिन –
सिविक कारला दोन इंजिन आहेत. यात 1.8-लीटर 4 सिलेंडर नॅचरल कॉम्प्रेस्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 138Bhp पॉवर आणि 174 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. त्याच वेळी, दुसरे 1.6 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 118Bhp पॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. ही कार सीव्हीटी स्वयंचलित गिअरबॉक्ससह येईल. डिझेल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येईल.

होंडा सीआर-व्ही
गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या होंडा सीआर-व्ही कारच्या खरेदीवर  कंपनी 4 लाख रुपयांची सूट देत आहे. होंडा सीआर-व्हीची किंमत 28.27 लाख ते 32.77 लाख रुपये आहे.

होंडा अमेझ –
होंडा अमेझवर 53 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. यामध्ये मेन्टेनेन्स प्रोग्राम्स आणि एक्सटेंडेंड वॉरंटी देणार आहे.1.2 पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजनमध्ये होंडा अमेझ ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

होंडा-बीआरव्ही –
होंडा-बीआरव्ही ही एक फॅमिली कार आहे.  ह्या कारच्या वेरिएंट्सवर कंपनी जवळपास 1.20 लाख रुपये बेनिफिट्स आणि ऑफर्स देत आहे.या कारची किंमत 9.51 लाख ते 13.81 लाख रुपये आहे. ही 7-सीटर फॅमिली कार आहे, जी 8 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

You might also like