वाहन खरेदी करायची असेल तर आत्ताच करा ! सरकार ‘दुप्पटी’ने वाढवणार ‘नोंदणी’ शुल्क, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येणाऱ्या दिवसात कार आणि बाइक महागण्याची शक्यता आहे. याचे कारण हे आहे की केंद्र सरकारने गाड्यांच्या नोंदणी आणि नुतनीकरणासाठी शुल्क वाढवण्याची तयारी केली आहे. या संबंधित केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे आणि लोकांकडून ३० दिवसात सूचना मागवल्या आहेत.

इतके असेल नोंदणीचे शुल्क
परिवहन मंत्रालयाच्या नोटिफिकेशन नुसार, ट्रांसपोर्टला न वापरण्यात येणाऱ्या लाइट मोटार गाड्यांच्या नव्या नोंदणीसाठी हे शुल्क ६ हजार रुपये ठरवण्यात आले. हे शुल्क आधी ६०० रुपये होते. लाइट मोटारच्या नोंदणीच्या नुतनीकरणाचे नवे शुल्क १५ हजार रुपये ठरवण्यात आले आहे. मोटार सायकलच्या नव्या नोंदणीचे शुल्क १ हजार आणि नुतणीकरणाचे शुल्क २ हजार रुपये ठरवण्यात आले आहे. ट्रांसपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या लाइट मोटर व्हेइकलच्या नव्या नोंदणीचे शुल्क १० हजार आणि नुतनीकरणाचे शुल्क २० हजार असणार आहे.

इलेक्ट्रिक वाहन्याच्या नोंदणीत सूट
या नोटिफिकेशनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांंच्या नोंदणीवर सूट मिळणार आहे. तर नोंदणीच्या च्या नुतणीकरणावर ३०० रुपये प्रतिमाह लेट फी म्हणून दंड आकारण्यात येईल. नव्या वाहनाच्या स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी २०० रुपये अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –