Budget 2019 : आता आधारकार्डनं देखील भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने एक लाभकारी निर्णय घेत आयकर दात्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने आयकर रिटर्न करणाऱ्यांसाठी पॅन कार्ड ची आनिवार्यता समाप्त केली आहे. आता पॅनकार्ड शिवाय आयकर भरता येणार आहे. हा निर्णय त्यांच्यासाठी दिलासा दायक आहे ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही.

म्हणून पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर –

संसदेत अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारामन यांनी सांगितले की, १२० कोटी पेक्षा आधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की, देशातील कोणाताही व्यक्ती आयटीआर भरताना पॅन नंबर ऐवजी आधार कार्डचा वापर करु शकतो. आधार कार्डच्या नंबरचा वापर पॅन कार्ड नसल्यास करण्यात येईल.

अर्थ मंत्र्यांनी सांगितले की, करदात्यांना पहिल्यापासून भरलेले आयकरचे विवरण मिळेल. यात वेतन, बॅकांकडून प्राप्त व्याज आणि कर कापल्यात आल्याचे विवरण सहभागी असतील. यामुळे आयटीआर दाखल करताना वेळ कमी लागेल आणि कराची योग्य गणना करता येईल.

अर्थ मंत्री म्हणाल्या की, सध्याच्या प्रणाली मध्ये करदात्याला बऱ्याच वेळा कर विभागाच्या चक्रा माराव्या लागतात. या दरम्यान अधिकाऱ्यांकडून करदात्याबरोबर चूकीचा व्यवहार करण्यात येतो. अर्थ मंत्र्यांनी सांगितले की, काही प्रकरणात करदात्यांचा कर अधिकाऱ्यांच्या नवा विना इलेक्ट्रॉनिक नोटीस पाठव्यात येईल. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनाच्या वापर करण्यावर सरकार भर देणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?