‘फोर्ब्स’च्या ‘टॉप’ 100 सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये ‘खिलाडी’ अक्षय कुमार एकमेव ‘भारतीय’, ‘या’ हॉलिवूड दिग्गजांना ‘धोबीपछाड’

मुंबई : वृत्तसंस्था – अमेरिकन मॅगेझिन फोर्ब्सने या वर्षातील जगभरातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा केवळ अक्षय कुमार आपले स्थान बनवू शकला आहे. 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा स्टार अक्षय कुमार आहे. अक्षय कुमार फोर्ब्सच्या यादीत 33 व्या क्रमांकावर आहे. त्याने एका वर्षात केलेली एकूण कमाई 65 मिलियन डॉलर(जवळपास 445 कोटी रुपये) आहे. कमाईच्या बाबतीत अक्षयने केवळ भारतीय स्टार्सलाच नाही तर, हॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स रिहाना, जॅकी चैन, ब्रेडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकले आहे. यावेळी या यादीतून सलमान खानही बाहेर पडला आहे. या यादीत भारतातील, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार या चार अभिनेत्यांचा समावेश होता. परंतु यावर्षी मात्र या यादीत केवळ अक्षय कुमारचं नाव आहे.

2018 मध्ये मिळाली होती सलमान खानलाही जागा

फोर्ब्सची ही यादी 2018 पासून जून 2019 दरम्यान स्टार्सच्या कमाईवर आधारीत आहे. मॅगेझिननुसार, 2019 च्या हाईयेस पेड सेलेब्रिटी लिस्टमध्ये अमेरिकन सिंगर टेलर स्विफ्ट टॉपवर आहे. मागील वर्ष म्हणजेच 2018बद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारने सर्व भारतीय स्टार्सना कमाईच्या बाबतीत मागे टाकले होते. परंतु सलमान खानलाही त्याच्यासोबत या यादीत जागा मिळाली होती. परंतु 2019 मध्ये या यादीतून सलमान खानची सु्ट्टी झाली आहे.

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा मिशन मंगल 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. मिशन मंगलमध्ये अक्षय सोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ति कुल्हरी आणि शरमन जोशी मुख्य भूमिकेत असणार आहेत. जगन शक्ती यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 15 ऑगस्ट रोजी या सिनेमाचा सामना जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस आणि प्रभासच्या साहो सिनेमासोबत होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

कडू कारल्यामध्ये ‘हे’ १४ औषधी गुण, जाणून घ्या

सिनेजगत

‘त्या’ कारणावरून अभिनेता सौरभ शुक्ला आणि ‘दबंद 3’च्या रायटरमध्ये जोरदार ‘भांडण’ !

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत पिता शक्ती कपूर म्हणतात…

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

बहुजननामा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या कामाची पॅलेस्टाईनने घेतली दखल, पॅलेस्टाईन सरकारकडून सन्मान

डिक्की देशभरात दलित तरुणांना उद्योजक करणार : मिलिंद कांबळे

बहुजन रयत पार्टीच्या महाराष्ट्रराज्य महासचिवपदी माधव मेकेवाड यांची निवड