home page top 1

‘या’ मोठया बँकेत पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी द्यावे लागतील 100 ते 125 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआयने  आपल्या ग्राहकांवर आता नवीन बोजा टाकला आहे. यामुळे आता या बँकेतील ग्राहकांना पैसे जमा करण्यासाठी 100 ते 125 रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागणार आहे. 16 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या या नियमांमध्ये आता मशीन द्वारे पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला हे शुल्क द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर झिरो बॅलन्स बचत खात्याला कोणत्याही बेसिक खात्यात किंवा बचत खात्यात  बदलण्याचे आदेश देखील आपल्या ग्राहकांना दिले आहेत.

डिजिटल व्यवहारांना प्राधान्य

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री यासंबंधित नोटीस आयसीआयसीआय बँकेने जारी केली होती. डिजिटलायझेशन वाढवण्यासाठी आम्ही ग्राहकांना प्रोत्साहित करत आहोत. यामुळे बँकेने सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क रद्द केल्याची घोषणा केली. यामध्ये NEFT, RTGS तसेच विविध प्रकारच्या ऑनलाईन सुविधांचा समावेश आहे.

आरटीजीएस  द्यावे लागत असे 45 रुपये

सध्या 10,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत एनईएफटी द्वारे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला  2.25  ते 24.75 रुपयांपर्यंत अतिरिक्त जीएसटी भरावा लागत असे. त्यामुळे साधारपणे या रकमेसाठी 45 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असे.

Loading...
You might also like