खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार १ लाख ६० हजाराचं ‘कोलॅटरल-फ्री’ लोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांना आता काहीही गहाण न ठेवता १.६ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना फक्त १ लाख रुपयांपर्यंत कर्ज काहीही गहाण न ठेवता देण्यात येत होते. देशातील फॉर्मल क्रेडिट सिस्टिममध्ये छोट्या आणि कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्याचा विचार आरबीआयने केला आहे. याबरोबर ५०,००० रुपयांपर्यंत छोटे कर्जासाठी शेतकऱ्यांना फक्त सेल्फ डिक्लेरेशन जमा करावे लागेल. त्यांच्यासाठी No Due प्रमाणपत्र जमा करण्याची अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे.

लायबिलिटी ग्रुप्सला बँकांच्या दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न देण्याची गॉरंटी देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे. मग त्याच्यांकडील जमीन कितीही कमी असेल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६००० रुपये जमा होणार आहे. ही रक्कम २ हजार रुपये अशी करुन वर्षाला 3 टप्प्यात देण्यात येईल.

नव्या योजनांवर काम करत आहे मोदी सरकार
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठी योजना आणणार आहे. या योजने अंतर्गत सोलर पॅनल स्थापित करत वीज उत्पादन करण्याचा व्यवसाय करु शकतात. यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न बनवण्याची संधी आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी सोलर पॅनल लावून दो मेगावाट वीजेचे उत्पादन करु शकतात. यातून त्यांना १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमावू शकतात. केंद्रीय मंत्री आर के सिंह यांना सांगितले की शेतकऱ्यांकडून निर्माण करण्यात येणारी वीज सरकार खरेदी करणार आहे. या योजनेची घोषणा काही दिवसात करण्यात येण्याची शक्यता आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात