बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी ‘सुवर्ण’संधी ! HDFC बँकेत ५००० जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी आता मोठ्या प्रमाणात भरती करणार असून तरुणांना तसेच फ्रेशर्सला यामध्ये संधी दिली जाणार आहे. यासाठी बँकेने ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स बरोबर करार केला असून यामध्ये पदवीधारकांना भरती होण्यापूर्वी एका वर्षाचा विशेष कोर्स करावा लागणार आहे.

३ वर्षात ५००० भरती

बँकेने बुधवारी मणिपाल ग्लोबल अकॅडमी ऑफ बीएफएसआईशी एक करार केला असून त्यामार्फत पुढील ३ वर्षात ५ हजार जागा भरण्यात येणार असून यासाठी इंस्टीट्यूट मध्येच खास एक वर्षाच्या कोर्समध्ये ट्रेनिंग देखील दिली जाईल.

इतकी आहे फी

या कोर्ससाठी तुम्हाला ३ लाख ३० हजार आणि इतर खर्च द्यावा लागेल. त्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला पगाराच्या रूपात ४ लाख रुपये मिळतील.

या पद्धतीने होणार भरती

बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले कि, आजच्या डिजिटल युगात कौशल्ये बदलली आहेत. त्यामुळे आम्हाला पर्सनल बँकिंगसाठी अशा तरुणांची आवश्यकता आहे जे त्यांच्याशी संवाद साधू शकतात. सध्या १०० पैकी आम्ही ६८ टक्के फ्रेशर्सना संधी देत आहोत. या आर्थिक वर्षात बँकेने जवळपास १० हजार तरुणांना संधी दिली आहे. यानंतर आता बँकेचा एकूण कर्मचारी वर्ग हा ८९ हजाराच्या घरात गेला आहे.

दरम्यान, सध्या बँकेने अनेक इंस्टीट्यूट बरोबर करार केला असून यामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक आपल्याबरोबर काम करण्याची संधी देणार आहे.


अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय