‘PMC’ च्या खातेदारांना ‘RBI’ चा ‘दिलासा’ ! सर्व ग्राहकांचे पैसे ‘सुरक्षित’, 30 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – आरबीआयने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को – ऑपरेटिव पीएमसी बँकच्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयकडून सांगण्यात आले की पीएमसी बँक खातेदारांना घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचे संपूर्ण पैसे एकदम सुरक्षित आहेत.

मंगळवारी आरबीआयच्या आधिकाऱ्यांची आणि पीएमसी बँकच्या खातेदारांची मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की आरबीआय या घटनेवर नजर ठेवून आहे. खातेदारांना घाबरण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचे पैसे पूर्णता सुरक्षित आहेत. आरबीआयने या प्रकरणी समस्या दूर करण्यासाठी 30 ऑक्टोबरची मुदत मागितली आहे, जर आरबीआय 30 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर खातेदार 31 ऑक्टोबर पासून आरबीआय आणि बँकेविरोधात आंदोलन सुरु करतील.

खातेदारांना आझाद मैदानात केले आंदोलन –
मंगळवारी पीएमसी बँक खातेदारांना मुंबईच्या आझाद मैदानात बँकेविरोधात आंदोलन केले. खातेदारांच्या हातात काळी दिवाळी, सेव्ह अस, इंनोसेंट्स आर लूजिंग लाइफ सारख्या घोषणा देत होते. आंदोलनकर्त्यांच्या मते 1 महिन्यापासून बँकेकडे 16 लाखपेक्षा जास्त खातेदारक, कुटूंब आपले पैसे मागत आहेत. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर एका मुलीने आत्महत्या केली आहे. परंतू सरकारने याला गांभीर्याने घेतले नाही. खातेदारांनी सांगितले की मागील 10 महिन्यात आरबीआयचे अधिकारी फक्त पाहत होते. त्यामुळे त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे.

Visit : Policenama.com