सावधान !… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षीच्या १ डिसेंबर पासून सरकारने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर  सर्व गाडयांना फास्टैग च्या आधारे टोल घेतला जाणार आहे. रस्ते  आणि  परीवहन मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले कि, १ डिसेंबर पासून टोल नाक्यांवर सर्व गाडयांना आता फास्टैगच्या आधारे टोल भरावा लागणार आहे.

जार्वत्या वाहनाला फास्टैग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल. यासाठी मंत्रालयाने राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून यासंबंधीचे आदेश पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या प्रत्येक टोल नाक्यावर एक हायब्रीड लेन असून फास्टैग शिवाय अन्य सुविधा देखील आहेत. मात्र त्यानंतर सर्व लेन या फास्टैग वाल्या केल्या जातील.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या फास्टैग नसताना देखल त्या लेनमधून जात असतात. या गाड्या रोख पैसे देऊन टोल भरत असतात. त्यामुळे फास्टैग वाल्या लेनमध्ये देखील गर्दी होते. त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेमुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि टोल नाक्यांवर होणारी गर्दी देखील कमी होईल. यासाठी सर्व टोल नाक्यांवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन वाहनांना कंपन्या लावत आहेत फास्टैग

मागील दिन वर्षांपासून नवीन वाहनांना फास्टैग लावणे अनिवार्य आहे.  त्यामुळे कंपन्या पहिल्यापासूनच वाहनांना फास्टैग लावून देत आहेत. जर तुमच्याकडे दोन वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीवर फास्टैग लावून घेण्याची गरज आहे.

येथून घेऊ शकता फास्टैग

१) भारतीय राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाचा टोलनाका
२) एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय  समवेत अनेक बँक
३) ऑनलाइन प्लेटफॉर्म पेटीएम, अमेझॉन डॉट कॉम
४) इंडियन ऑईल  कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पम्प
५) नेशनल हायवे अथॉरिटीचे माय फास्ट ऐप

या कागदपत्रांची आहे गरज 

१) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
२) पासपोर्ट साइज फोटो
३) केवाईसी डॉक्यूमेंट, आयडी प्रूफ, अड्रेस  प्रूफ