छोट्या शहरांमध्ये धावणार ‘मेट्रोलाइट’, एका वेळी ‘३००’ प्रवासी करु शकणार ‘स्वस्त’ आणि ‘सुलभ’ प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने छोट्या शहरात आणि विभागात लाइट अर्बन रेल ट्रांजिट सिस्टम मेट्रोलाइट सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही मेट्रोलाइन अशा छोट्या शहरात सुरु करण्यात येणार आहे जेथे कमी प्रवासी आहेत. या रेल्वेचे ३ कोच असणार आहे, आणि वेग २५ किमी प्रति तास असणार आहे.

राज्य सरकारला आर्थिक सहकार करणार केंद्र सरकार –

केंद्रीय आवास आणि शहरी कामकाज मंत्रालयने मेट्रोलाइट सिस्टम संबंधित सूचना जारी केली आहे. या मेट्रोला जमीनीवर आणि एलीवेटिड भागात डेवलप करण्यात येणार आहे. यात केंद्र सरकार राज्य सरकाराला आर्थिक मदत करणार आहे. ज्यातून लाइट अर्बन रेल ट्रांजिट सिस्टम सुरु करु शकतील. मंत्रालयाच्या मते मेट्रोलाइटला शहरी मेट्रो सिस्टमला अतंत्य कमी खर्चात तयार करण्यात येईल. हे छोट्या शहरातील लोकांना मेट्रो पर्यंत आणण्यासाठी फीडर सिस्टम म्हणून काम करेल.

३०० प्रवासी करु शकतील प्रवास –

तीन कोच असलेल्या या रेल्वेत ३०० प्रवासी प्रवास करु शकतील. मेट्रोलाइटसाठी एक वेगळा रस्ता बनवण्यात येईल. ज्याला रस्त्याचा रहदारीपासून वेगळे ठेवण्यात येईल. जमिनी पासून उंचावर ट्रक तेव्हाच बनवण्यात येईल जेव्हा रस्त्यावर रेल्वे ट्रक बनवणे शक्य नसेल.

तिकिट न काढल्यास भरावा लागेल दंड –

मेट्रोलाइट सिस्टममध्ये शेल्टर प्लॅटफार्म असेल. ज्यात AFC (Automatic Fare Collection) गेट, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोर, एक्स रे आणि सामान स्कॅन करण्यासाठीची सिस्टम नसेल. रेल्वे आणि शेल्टरमध्ये तिकिट चेकिंगसाठी मशील इंस्टॉल करण्यात येईल. जर कोणी प्रवासी यातून विना तिकिट प्रवास करतील तर त्यांना दंड भरावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त –