खुशखबर ! घरमालकांच्या मनमानीला ‘लगाम’, भाडेकरूंच्या सुविधेसाठी सरकारचं ‘मोठं’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमचा ताण कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. घर मालक आता घराचे भाडे अचानक वाढवू शकणार नाहीत. घर मालक आणि भाडेकरु यांच्यातील वाद कमी करण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. जास्तीत जास्त संपत्ती भाड्याने देण्यात यावी यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी मॉडेल रेंटल कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यात घर मालक आणि भाडेकरु या दोघांचा देखील विचार सरकारकडून करण्यात आला आहे.

दोन महिने जास्त राहिल्यास भाडेकरुला दुप्पट भाडे द्यावे लागेल –

भाड्याने देण्यासाठी करण्यात आलेल्या या कायद्यात सिक्युरिटी एडवांसवर बंदी आणण्यात येणार आहे. यात सांगण्यात आले आहे की, कोणीही घर मालक दोन महिन्यापेक्षा जास्त भाडे अॅडवान्स रुपात घेणार नाही. यात सांगण्यात आले आहे की, जर भाडेकरु भाड्याने देण्यात आलेल्या घरात जर ठरलेल्या काळा पेक्षा आधिक काळ घरात राहिल्यास त्याला दोन महिन्यासाठी दुप्पट भाडे द्यावे लागेल. दर भाडेकरु दोन महिन्यापेक्षा आधिक काळ भाड्याच्या घरात राहिला तर त्याला ४ पट आधिक भाडे द्यावे लागेल. हा ड्राफ्ट सध्या विचारधीन आहे. यावर विचार केल्यानंतर कॅबिनेटकडे ते मंजूरीसाठी पाठवले जाईल.

मनाला येईल तेव्हा घर मालक भाडेवाढ करु शकणार नाही –

ड्राफ्ट मध्ये सांगण्यात आले आहे की, घर मालक करार संपण्याआधी आपल्या मर्जी नुसार भाडे वाढवणार नाही. घर मालकाला घराच्या भाड्यात वाढ करायची असल्यास भाडेकरुला ३ महिने आधी सुचना द्यावी लागेल. कराराचा कालावधी समाप्त होताच भाडेकरुला सिक्युरिटी डिपॉजिट भाडेकरुंना परत करावे लागेल. तसेच काही वाद झाल्यास घर मालक भाडेकरुची वीज किंवा पाणी बंद करणार नाही.

रेंटल कायद्यानुसार, घर मालक आणि भाडेकरु यांना अॅथाॅरिटीला सूचना देणे आवश्यक आहे. भाडे करार झाल्यानंतर मासिक भाडे, कराराचा कालावधी, घराचा देखभाल खर्च यांची माहिती देणे आवश्यक आहे. वाद झाल्यास घर मालक किंवा भाडेकरुंना ही अॅथॉरिटी आधार ठरु शकते. जर कोणी भाडेकरु दोन महिन्याचे भाडे देणार नाही तर घर मालक त्याची तक्रार अॅथॉरिटीकडे करू शकतो.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय