मोदी सरकार महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यात बनवणार 950 कि.मी.चे ‘हायवे’, होणार 30 हजार कोटीचा ‘खर्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशातील आठ राज्यातील 950 किलोमीटर हायवे निर्माणसाठी निवड केली आहे. हे सर्व हायवे प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी 30 हजार कोटी रुपये लागणार आहेत. याची निर्मिती सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप (पीपीपी) च्या माध्यमातून होईल.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, एनएचएआयने संपूर्ण देशात विविध भागात महामार्ग निर्माण करण्यासाठी निवडण्यात आले आहेत. मंत्रालयानुसार या महामार्गांचा निर्मिती पीपीपी च्या माध्यमातून बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर (बीओटी) आधारे करण्यात येईल. म्हणजेच या सर्व हायवे टोलवर आधारित असतील. या सर्व हायवेची निर्मितीची निवड योग्य चर्चेनंतर करण्यात येईल.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार निवड करण्यात आलेले भागांची एकूण लांबी 950 किलोमीटर आहे, ज्याच्या निर्मितीसाठी 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल. ज्या राज्यात या हायवेची निर्मिती होईल, त्यात आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.

यात सांगण्यात आले की प्रधिकरण पहिल्यांदा 4 आणि 6 लाइन नॅशनल हायवे तयार करण्यासाठी एनुअल प्री क्वालिफिकेशन प्रपोजल मागण्यात आले आहे. एनुअल प्री क्वालिफिकेशन प्रपोजलच्या प्रक्रियेची निविदा प्रक्रिया सोपी होईल. तसेच यांने बाजारातील प्रतिक्रिया देखील मिळेल.

 

You might also like