हे खरंय, नोटबंदी केल्यानंतर देशामध्ये १९ टक्यांनी वाढली रोख रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोटबंदी केल्यानंतर कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी सरकार कडून खूप प्रयत्न करण्यात आले. हे सर्व प्रयत्न करून सुद्धा प्रचलित नोटांचे मूल्य १९ टक्यांनी वाढून २१,१३७.६४ अब्ज रुपयावर गेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत ही माहिती दिली. नोटबंदीच्या आधी ४ नोव्हेंबर २०१६ ला १७,७४१ अब्ज रुपयांच्या नोटा चलनात होत्या. या वर्षी २९ मार्चपर्यंत ही रक्कम वाढून २१,१३७.६४ अब्ज रुपयांवर पोहचली आहे.

रोख पैशामध्ये होणाऱ्या व्यवहारांमुळे वाढतो भ्रष्टाचार

नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी केली होती. यानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात आणण्यात आल्या. यानंतर सरकारकडून सांगण्यात आले की नोटबंदीचा उद्देश हा कॅशलेस व्यवहार वाढवणे आहे.

अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम कमी करणे हा नोटबंदीचा उद्देश आहे. सीतारामन यांनी आर्थिक अहवाल २०१६ -१७ चा संदर्भ देऊन सांगितले की, जगभरात रोख रक्कम आणि भ्रष्टाचार यांच्यामध्ये एक मजबूत नाते असते. व्यवहारात रोख रक्कम जितकी जास्त असेल तेवढा भ्रष्टाचार वाढेल.

नोटबंदी झाल्यानंतर ९९.३ % परत आल्या

RBI च्या ऑगस्ट २०१८ च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१७ – १८ मध्ये बंद करण्यात आलेल्या ९९.३% नोटा पुन्हा बॅंकेत परत आल्या. नोटबंदीच्या वेळेस १५.४१ लाख कोटी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनात होत्या. RBI ने सांगितले की, यांपैकी १५.३१ लाख कोटी मूल्याच्या नोटा बँकेत परत आल्या. याचा अर्थ बंदी करण्यात आलेल्या नोटांपैकी १०, ७२० कोटीच्या नोटा बँकेकडे परत आल्या नाहीत.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव