खुशखबर ! फक्त १२ हजार रुपयांत Goa Delight प्लॅन, करा गोव्यात ‘धमाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात आवडते ठिकाण म्हणजे गोवा. अनेक परदेशी नागरिक देखील गोव्याला भेट देत असतात. तुम्हीदेखील अजूनपर्यंत गोव्याला गेला नसाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर वाट पाहत आहे. आयआरसीटीसीने एक गोवा पॅकेज आणले आहे. या पॅकेजचे नाव Goa Delight असे असून या पॅकेजमध्ये तुम्ही २ रात्र आणि ३ दिवस राहू शकता. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाईटवर तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल. या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ८ सप्टेंबर पासून या टूरला सुरुवात होणार आहे.

हैदराबाद पासून होणार सुरुवात

या गोवा ट्रीपची सुरुवात हैदराबाद पासून होणार आहे. इंडिगो फ्लाइट चाय इकॉनॉमी क्लासमधून जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल.

पॅकेजमध्ये या सुविधा मिळणार

विमान प्रवासाबरोबरच तुम्हाला या पॅकेजमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स, ब्रेकफास्ट आणि डिनर मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पॅराडाइज विलेज बीच रिसोर्ट यामध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी देखील मिळणार आहे.

पॅकेज किंमत

आयआरसीटीसीचे हे विशेष पॅकेज घेतल्यानंतर तुम्हाला यासाठी १६,४१५ रुपये द्यावे लागणार आहेत. दोन व्यक्तींसाठी तुम्हाला प्रत्येकी १२,९५५ रुपये द्यावे लागणार आहेत. तर ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी तुम्हाला १२,६२५ रुपये मोजावे लागणार आहेत. जर तुम्हाला २ ते ११ वर्षांपर्यंतचे मुलं आहे तर तुम्हाला त्यासाठी १०९८० रुपये बेडसह मोजावे लागणार आहेत. तर बेड नको असेल तर १०७३० रुपये मोजावे लागणार आहेत.

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

मेगाभरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे का ? त्यांची लुट करण्यासाठी